रीक्षातून पडल्याने प्रवाशाचा जागीच मृत्यू


फैजपूर : भुसावळ ते फैजपूर दरम्यान प्रवासी रीक्षातून प्रवास करणार्‍या एका प्रवाशाचा खाली पडल्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान घडली. प्रवाशाला झोप लागल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. भागवत आदिनाथ सैतवाल (55, खिर्डी) असे मयत प्रवाशाचे नाव आहे. भुसावळकडून फैजपूरकडे निघालेली रीक्षा (एम.एच.19 व्ही.8385) वरून सैतवाल हे निघाले असता ते रीरक्षात डाव्या बाजूने बसलेले असताना त्यांना झोप लागल्याने ते आमोदा गावाजवळ हॉटेल मानसीजवळ खाली पडले. त्यांना तातडीने त्याच रीक्षातून फैजपूर येथे खाजगी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी रीक्षा चालक सचिन केदारे यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !