भुसावळात प्रथमच जेसीआयतर्फे क्लॉक टॉवर बनणार

शहराच्या सौदर्यात भर : जेसीआय भुसावळ ताप्ती क्लबचा उपक्रम


Clock tower will be built by JCI for the first time in Bhusawal भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील स्व.मोटू सोबराज चौकात आता जेसीआय भुसावळ ताप्तीतर्फे जेसीआय क्लॉक टॉवर बणवण्यात येत असून या माध्यमातून शहराच्या सौंदर्यात अधिकच भर पडणार आहे. यापूर्वी या चौकात कारंजे लावण्यात आले मात्र देखभाल दुरुस्तीअभावी हे कारंजे बंद पडल्यानंतर जेसीआयच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याने जेसीआयतर्फे क्लॉक टॉवर लावण्यात येणार आहे. टॉवरचे भूमिपूजन आमदार संजय सावकारे व जेसीआयच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी केले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
या सोहळ्यासाठी जेसीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.के.कार्थिकेयन, मुख्याधिकारी महेश वाघमोडे, जेसीआयचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.निलेश झवर, आंचल अध्यक्ष जितेंद्र बोरा, सचिव जयश्री अग्रवाल, उद्योजक मनोज बियाणी, डॉ.संगीता बियाणी, विकास पाचपांडे, संगीता अग्रवाल, नूतन फालक, मनीषा पाटील, पल्लवी झोपे, दीपा पटेल, मकरंद चांदवरकर, सुनीता पाचपांडे, हेमा बेहरा, जेसीआय भुसावळ ताप्ती परीवारातील सदस्य उपस्थित होते.

सौर उर्जेवर चालणार घड्याळ
भुसावळात उभारण्यात येणार टॉवरची उंची साधारण 20 फूट राहणार असून त्यावर लावण्यात येणारे क्लॉक सौर उर्जेवर चालणारे असेल. दोघा दिशेने क्लॉक पाहता येईल, अशी सोय असणार असून दोन ते तीन महिन्यात काम पूर्ण होईल. शहरात प्रथमच क्लॉक टॉवर बनवण्यात येत असल्याने नागरीकांमधून समाधान व्यक्त होत आहे. संपूर्ण भारतातील भुसावळ शहरात हा पहिला जेसीआईचा क्लॉक टॉवर होणार असल्याचे एम.के.कार्थिकेयन यांनी सांगत पदाधिकार्‍यांच्या कामाचे कौतुक केले. सूत्रसंचालन डॉ.मोनिका अग्रवाल तर आभार सचिव जयश्री अग्रवाल यांनी मानले. यशस्वीतेसाठी दीपा पटेल, सोनल जवर, पल्लवी झोपे, ऋचा अग्रवाल, ज्योती दरगड, हेमा बेहरा, निकिता अग्रवाल, राखी झवर, आभा दरगड, रेखा व्यास, श्रृती लाहोटी, सुनीता अग्रवाल, सुनीता दरगड व संपूर्ण क्लबच्या सदस्यांनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !