मतदारांशी द्रोह करणार्‍यांना सहानुभूती नाहीच : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


Those who betray voters have no sympathy : Chief Minister Eknath Shinde मुंबई : ज्यांनी बाळासाहेबांशी गद्दारी आणि मतदारांशी द्रोह केला त्यांना सहानुभूती निश्चितच मिळणार नाही. तुम्ही अडीच वर्षात जितक्या सह्या केल्या तितक्या मी आता एका दिवसात करतो, तुम्ळी खिशात पेन ठेवत नव्हते मात्र दोन पेन मी खिशात ठेवले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें म्हणाले. शिवसेनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त गोरेगावच्या नेस्को सेंटर इथं मेळावा झाला. याप्रसंगी ते बोलत होते. हा महाराष्ट्र माझा परिवार आहे. त्यामुळे मला जास्तवेळ काम करावे लागते असं त्यांनी सांगितले.

तुम्ही किती वेळा जेलमध्ये गेले ?
पानवाला, टपरीवाला, रिक्षावाला याच लोकांना घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली. त्याच लोकांना तुम्ही हिणवता. बाळासाहेबांची एक डरकाळी फुटल्यानंतर देश स्तब्ध व्हायचा ते याच लोकांमुळे, स्वत:चा जीव धोक्यात घातला, कुटुंबाची पर्वा केली नाही. कितीतरी लोकांचे जीव शिवसेना वाढवण्यासाठी जीव गेले, अनेकांनी जेल भोगली, तुम्ही कुठे होता, किती केस झाल्या तुमच्यावर? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
तुम्ही तर गाडी चालवत होतात
एकनाथ शिंदेंनी कर्ज काढून निवडणुका लढवल्या आहेत. मिळेल ते काम केले, कष्ट केले, वयाच्या 20 व्या वर्षी बेळगावच्या जेलमध्ये 40 दिवस होता. कितीतरी केसेस दाखल झाल्या. व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांनी तेच भोगलेय म्हणून शिवसेना मोठी झाली, पुढे गेली असं त्यांनी सांगितले. शेतकर्‍याच्या मुलाने हेलिकॉप्टरमध्ये बसू नये, चांगल्या गाडीने फिरू नये. मी शेतकरी म्हणून शेती करतो. तुम्ही सरकार चालवायचे सोडून गाडी चालवत होतात. मी गाडीतून जेव्हा जात होतो तेव्हा फाईली घेऊन जातो, रस्त्यात कामे करतो. अडीच वर्षात जितक्या सह्या झाल्या नाहीत तितक्या एक दिवसांत करतो.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !