मुक्ताईनगर तालुका रेशन दुकानदार संघटनेतर्फे आमदार चंद्रकांत पाटलांना साकडे
विविध समस्या सुटण्यासह मागण्यांची व्हावी पूर्तता
मुक्ताईनगर : अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवाना धारक महासंघ पुणे, ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशन, नवी दिल्ली यांच्या संलग्न जळगाव जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक संघटना शाखा मुक्ताईनगरतर्फे स्वस्त धान्य दुकानदारांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना निवेदन देत धान्य पुरवठा करण्याबाबत येणार्या विविध अडचणी मार्गी लावण्या संदर्भात शनिवारी निवेदन दिले. स्वस्त धान्य दुकानदारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्व शासकीय स्वस्त धान्य दुकानदार युनियन संघटना, मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव यांच्या वतीने शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांना मागील महिन्यापासून धान्य भरणा करताना मूळ धान मिळकतीसाठी मुळ नियतना प्रमाणे धान्य मिळत नाही. धान्याबाबत तहसील कार्यालयास विचारणा केल्यात मागील वाटप शिल्लक असल्याचे सांगून विविध कारणे सांगितली जातात. सर्व स्वस्त धान्य दुकानात धान्य शिल्लक नसून जास्त क्विंटल मध्ये किंवा किला मध्ये असे सांगितले आह. ही तफावत असून धान्य लाभार्थींना कसे वाटण्यात येईल व दुकानदारांनी लाभार्थी यांना धान्य कसे वाटप करावे ? हा प्रश्न आहे. हा विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विषय मार्गी लावावा, अशी निवेदनात मागणी करण्यात आली. निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष प्रशांत भालशंकर, उपाध्यक्ष गोपाळ पाटील, सचिव संजय पाटील, धान्य दुकानदार अजबराव पाटील पुंडलिक सरक, शिवा इंगळे, सुशील संतोष पाटील, पिंटू पाटील, पिंटू चव्हाण यांच्यासह तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.

