भालशीव गावात किरकोळ वादातून दंगल ; दोन संशयीत अटक
Riot due to minor dispute in Bhalshiv village ; Two suspects arrested यावल : तालुक्यातील भालशीव दंगल प्रकरणी दोन संशयीतांना पोलिसांनी अटक केली आहे. संशयिताना यावल न्यायालयात हजर केले असता दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
किरकोळ वादातून उसळली दंगल
भालशीव येथे जिल्हा परीषद शाळेजवळ बकरीला दुचाकीचा धक्का लागल्यानंतर वाद होत हाणामारी झाली होती. यामध्ये दोन्ही गटातील सात जण जखमी झाले. दोन्ही गटातील 13 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर निलेश लक्ष्मण कोळी, बापू नामदेव कोळी या दोघांना पोलिसांनी अटक केली. संशयिताना यावल न्यायालयात हजर केले असता दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप सूर्यवंशी करीत आहेत.