भुसावळात जबरी चोरी : आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात


भुसावळ : शहरातील स्वामी समर्थ केंद्राजवळ तक्रारदार मोहित महेश सोनी यांना संशयीत आरोपी संजय उर्फ पुतली, वसीम खान, अश्फाक आणि सूर्या आदींनी लुटल्याची घटना घडली होती. आरोपींनी चांदीचे ब्रेसलेट, मोबाईल, आधार कार्ड असा 44 हजाराचा ऐवज जबरीने लुटून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याती आरोपी संजय मुक्तारे (रा. भारतनगर, मनमाड) हा रविवारी भुसावळ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तीनवर आल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, संदीप परदेशी, सुनील जोशी, रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, विकास सातदिवे, रवींद्र तायडे, ईश्वर भालेराव आणि चेतन ढाकणे आदींच्या पथकाने केली.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !