भावी नवरदेवासह चुलतभावाचा अपघाती मृत्यू
किनोद-फुफणी रस्त्यावर दोन दुचाकी समोरा-समोर धडकल्याने अपघात
जळगाव : दुचाकी समोरा-समोर धडकून झालेल्या अपघातात भावी नवरदेवासह चुलतभावाचा अपघाती मृत्यू झाला. रविवारी दुपारी चार वाजता किनोद-फुफणी रस्त्यावर ही घटना घडली. भूषण विठ्ठल सोनवणे (वय 23), रवींद्र भगवान सोनवणे (वय 27, रा. देवगाव ता. जळगाव) असे मयतांचे नाव आहे. भूषण व रवींद्र हे चुलभाऊ रविवारी जळगावात बाजारासाठी आल्यानंतर परतीच्या प्रवासात या भावंडाच्या दुचाकीला समोरुन येणार्या दुचाकीची धडक झाल्याने भूषणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर रवींद्रची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचीही प्राणज्योत मालवली. दरम्यान, या अपघातात दुसर्या दुचाकीवरील जितेंद्र सोनवणे व बारकू पावरा (फुपणी) हे जखमी झाले आहेत.

