जळगावात महिला डॉक्टरांचा विनयभंग
Female doctor molested in Jalgaon जळगाव : रुग्णांची वाढलेली गर्दी पाहून एकाने जळगावातील महिला डॉक्टरांना वारंवार स्पर्श करून त्यांच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. या प्रकरणी एकाविारोधात एमआयडीसी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अनिल जीवन पाटील (जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
गर्दी पाहून केला विनयभंग
जळगावातील 47 वर्षीय असलेल्या महिला डॉक्टर एका रुग्णालयात सेवा देतात.
शुक्रवार, 16 जून रोजी सायंकाळी दवाखान्यात गर्दी वाढल्यानंतर या गर्दीचा गैरफायदा घेत अनिल पाटील याने महिला डॉक्टरांना वारंवार चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याने महिला डॉक्टर वैतागल्या. त्यांनी या प्रकरणी गुरुवार, 22 जून रोजी संबंधीत इसमाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय पाटील करीत आहेत.


