चाळीसगाव शहर पोलिसांची अवैध धंद्यांविरोधात वॉश आऊट मोहिम
चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी वॉश आऊट मोहिमेंतर्गत अवैध धंदे चालकांविरोधात मोहिम उघडली असून अवैधरीत्या दारू बनवणार्या हातभट्टी करीत 67 हजारांचा मुद्देमाल करीत पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला. या कारवाईने अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली.
67 हजारांचे साहित्य जप्त
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरीत्या गावठी हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहरचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र.चा., पाटखडकी, वाघडु व पातोंडा शेतशिवारात अवैध गावठी हातभट्टीवर छापा टाकून दारू बनविण्याचे कच्चे रसायन नष्ट केले. तसेच दारू बनविण्याचे 67 हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
यांच्याविरोधात गुन्हा दाखल
गोकुळ सदा भिल्ल (रा.टाकळी प्र.चा.), संतोष दामु सोनवणे (पाटखडकी), प्रकाश गायकवाड (टाकळी प्र.चा.), भाउसाहेब देवराम गायकवाड (पातोंडा)व बारकू खुशाल पाटील (वाघडू, नवागांव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्या पथकाकडून कारवाई
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सागर ढिकले, सहाय्यक निरीक्षक् विशाल टकले, सहाय्यक निरीक्षक सचिन कापडणीस, उपनिरीक्षक सुहास आव्हाड, हवालदार अजय मालचे, रमेश पाटील, तुकाराम चव्हाण, किशोर पाटील, अमित बाविस्कर, राकेश पाटील, नरेंद्र चौधरी, समाधान पाटील, सुनिल निकम, ज्ञानेश्वर गीते, विनोद खैरनार, ज्ञानेश्वर पाटोळे, प्रवीण जाधव, अमोल भोसले, नंदकिशोर महाजन, महेंद्र सूर्यवंशी, विजय पाटील, शरद पाटील, चत्तरसिंग महेर, आशुतोष सोनवणे यांच्या पथकाने कारवाई केली.


