विज्ञान शाखेत प्रवेश घेतला, पण नियतीने केला घात ; शिंदीतील तरुणाच्या मृत्यूने हळहळ
A young man in Shindi died after being hit by a tanker भडगाव : पेट्रोलची वाहतूक करणार्या टँकरच्या धडकेने भावेश रामेश्वर पाटील (रा.शिंदी) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गुरुवार, 22 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. दरम्यान, भावेशने नुकताच भडगाव महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतलाहोता मात्र नियतीने घात केल्याने शिंदी गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.

भावेश हा त्याच्या दुचाकीने जात असताना त्यास पेट्रोल टँकरने जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला भडगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता तेथे वैद्यकीय अधिकार्यांनी मृत घोषित केले. भावेश याने नुकताच भडगाव महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. शिक्षण घेऊन मोठे होण्याची त्याची इच्छा होती. परंतू तोपूर्वीच नियतीने घात केला.
या प्रकरणी मृताचे काका बापूराव विक्रम पाटील यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिस ठाण्यात पेट्रोल टँकर चालक दत्तू गंगाधर धानगे ( रा. भालूर, ता. नांदगाव) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पांडुरंग सोनवणे करीत आहे.