आदिवासी शिक्षकाच्या नावाने थाप मारून सव्वा दोन लाखांचा घातला गंडा ; चोपड्यात फसवणुकीपूर्वीच संशयित यावल पोलिसांच्या जाळ्यात
Fraud of businessman in Kingaon : Suspect arrested from Chopda यावल : तालुक्यातील किनगाव येथील एका व्यावसायीकाची एकाने बांधकाम साहित्य खरेदी करीत खोटे धनादेश देत फसवणूक केली होती. तब्बल दोन लाख 25 हजारांचे साहित्य संबंधीत घेवून गेल्यानंतर संशयीत चोपडा येथे एका ढेप व्यापार्याची फसवणूक करण्याच्या बेतात असतांना किनगाव येथील व्यावसायीकाच्या निर्दशनास आले व त्यांनी तेथून त्यास पकडून यावल पोलिसांच्या स्वाधीन केले. संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
धनादेशाचा अनादरानंतर संशयित पसार
किनगाव, ता.यावल येथील बांधकाम साहित्य व्यवसायीक भूषण पाटील यांच्या दुकानातुन 17 जून 2023 ते 22 जून 2023 या कालावधी दरम्यान आरीफ खान ईसा खान (रा.विवरे) व फोनवर आदिवासी शाळेतील शिक्षक म्हणून बोलणार्या व्यक्तीने आपले नाव व पत्ता खोटा सांगून दोन लाख 25 हजार 36 रुपये किंमतीचे सिमेंट, आसारी व इतर बांधकाम साहित्य खरेदी केले. या रक्कमेचा धनादेश त्यांनी दिला होता व साहित्य घेवून ते निघुन गेले मात्र जेव्हा धानदेश बँकेत टाकला तेव्हा तो खोटा व बनावट असल्याचे निष्पन्न झाले. संबधीतांने आधी आपले नाव व पत्ता खोटा सांगितला असल्याने त्याचा शोध घेणे शक्य झाले नाही.
चोपड्यात फसवणुकीपूर्वीच बेड्या
दरम्यान या चोपडा शहरातील एका ढेपच्या व्यापार्याची अशाचं प्रकारे फसवणूक करतांना आरीफ खान ईसा खान (रा.विवरे) हा आढळून आल्यो पाटील व त्यांच्या मित्रांनी पोलिसांना माहिती दिली व त्यास चोपडा येथून पकडून यावल पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्यासह अज्ञात सहकार्यांविरूध्द फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, हवालदार नरेंद्र बागुले, भूषण चव्हाण करीत आहे.



