मलकापूरच्या पोलिस निरीक्षकांना निलंबीत करा
भुसावळातील सर्व बहुभाषीक ब्राह्मण समाजाची प्रांत प्रशासनाकडे मागणी
भुसावळ : मलकापूर पोलिस ठाण्यातील निरीक्षक कैलास नागरे यांनी आशिष अशोक शर्मा यांच्या वाहनाला नंबरप्लेट नसल्याच्या कारणावरून दंडासाठी कार्यालयात बोलावल्यानंतर ब्राह्मण समाजाच्या बाबतीत जातीवाचक अपशब्द वापरून अश्लील शब्दात शिवीगाळ केल्याने ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्याने भुसावळातील सर्व बहुभाषीक ब्राह्मण समाजबांधवांनी सोमवारी प्रांताधिकारी प्रशासनाकडे निरीक्षक कैलास नागरे यांना निलंबीत करण्यासह त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. समाजाच्या रक्षकांकडून असा प्रकार होत असल्यास न्याय मागायचा कुठे? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. न्याय न मिळाल्यास राज्यभरात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
निवेदनावर उमाकांत शर्मा, जयप्रकाश शुक्ला, पं.रवीओम शर्मा, अभिलाष नागला, गौरव शर्मा, रमाशंकर दुबे, लिलाधर जोशी, प्रशांत शर्मा, विजय जोशी, सागर पत्की, कैलास उपाध्याय, दीपक सीखवाल, प्रशांत उपासनी, अनिरूद्ध कुलकर्णी, भूषण वैद्य, आशुतोष दलाल, भूषण जोशी, गौरव हिंगवे, चेतन भोई, संतोष चौबे, राम शर्मा, आनंद जोशी, देवेश कुलकर्णी, योगेंद्र जोशी, शुभम जोशी आदींसह समाजबांधवांच्या स्वाक्षर्या आहेत.

