मराठा समाज मंडळातर्फे दीपनगरात वार्षिक स्नेहमेळावा
दीपनगर : फेकरी, निंभोरा बुद्रुक येथील मराठा समाज मंडळातर्फे वार्षिक स्नेहमेळावा घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शालेय तसेच पदवीधर विद्यार्थी- विद्यार्थिनी यांचा गौरव करण्यात आला तसेच समाजबांधवांच्या पाल्यांना स्वेटर वाटप करण्यात आले व महानिर्मिती कंपनीच्या सेवेतून सेवानिवृत्त कर्मचार्यांचा सत्कारही करण्यात आला.
समाजाच्या सदैव पाठीशी-आमदार
दीपनगर येथे माझ्या मतदारसंघातील काही मंडळी कार्यरत आहेत त्यांचे योगदान मला लाभले असून समाज आणि समाजाव्यतिरिक्त कोणत्याही मंडळीवर जर अन्याय होत असल्यास मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली. प्रसंगी समाजाच्या वतीने समाजाचे अध्यक्ष नारायण सोनवणे, उमाकांत चव्हाण, राजेंद्र निकम, संजय परवान व मराठा समाज तालुकाध्यक्ष किरण पाटील, अॅड.तुषार पाटील, सागर लांजुळकर, मुकेश सोनवणे, आकाश पाटील यांच्या हस्ते आमदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी संक्रांत मेळावा झाला. समाजाला खरा इतिहास कळण्यासाठी चंद्रशेखर लिखित प्रती इतिहास हे पुस्तक भेट देण्यात आले.
यांनी घेतले परीश्रम
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय देसाई, अनिकेत सोळस्कर, विकास पाटील, अरुण शिंदे, अमोल रोकडे, प्रवीण पाटील, अनिकेत सपकाळे, महेश डोंगरे, अनंत सोनवणे, कैलास लांजुळकर, दत्तात्रय साबळे, अतुल पाटील, अशोक पवार, सचिन नाकाडे, अतुल टेकाडे, वाल्मीक कवडे यांनी परीश्रम घेतले.

