सुरतमधील रघुवीर सेलियम मार्केटमध्ये भीषण आग
सुरत : सुरतमधील रघुवीर सेलियम मार्केटमधील दहा मजली इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल 40 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शॉर्टसर्किटमुळे ही भीषण आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

