एस.टी.बस-ओमनीचा अपघात : चालकाचा मृत्यू
दसेगाव फाट्यावरील घटना : अपघाताचे सत्र सुरूच
चाळीसगाव : दसेगाव फाट्याजवळ भरधाव एस.टी. व ओमनी एकमेकांवद आदळल्याने ओमनी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास घडली. गुलाब युवराज खैरनार (40, रा.भोरस, ता.चाळीसगाव) असे मयताचे नाव आहे. उस्मानाबाद-सुरत बस (एम.एच .20 बी.एस.3525) ही धुळ्याकडे जात असताना समोरून भरधाव येणारी ओमनी (एम.एच. 21 बी. 328) ची समोरा-समोर धडक झाल्याने ओमनी चालक गुलाब युवराज खैरनार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना चाळीसगावी रुग्णालयात उपचारार्थ नेत असतानाच त्रस्त्यातच यांची प्राणज्योत मालवली
मृत्यू झाला. याप्रकरणी बस चालक अमोल मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

