पुण्यात किरकोळ कारणावरून तरुणाचा खून : चौघे जाळ्यात


पुणे : विश्रांतवाडी येथील धानोरी परीसरात किरकोळ कारणावरून सागर महादेव भालेराव (24, रा.मुंजाबावस्ती, धानोरी) या तरुणाचा मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास खून झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आह.े या प्रकरणी चार संशयितांना विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सागर हा बिगारी काम करत होता. रात्री जेवणानंतर तो व त्याचे मित्र येथील मुंजाबावस्ती गणपती मंदिर चौकातून पायी जात असताना त्यावेळी त्यांच्यासमोरुन एक जण बुलेटवर गेला. सागर याला तो आपला मित्र असल्याचे वाटले म्हणून त्याने आवाज दिला. त्याचवेळी त्याच्या पाठोपाठ आणखी एक दुचाकीवरुन दोघे जण आले. त्यांनी सागरला तू आवाज का दिला, तू कोण आहेस असे विचारले. यावरुन त्यांच्यात वाद झाला़ याच वादातून दुसर्‍या गटातील पाच ते सहा जणांच्या टोळक्याने लाकडी पट्ट्यासह लाथाबुक्यांनी मारहाण केल्याने सागर गंभीर जखमी झाला. उपचारार्थ ससून रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !