यावल पोलिस निरीक्षक अरुण धनवडेंनी ग्रामीण जनतेशी साधला संवाद


ग्रामीण भागातील जनतेला कायद्याची दिली माहिती

यावल : तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी पोलिस ठाण्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर जनसंपर्क मोहिमेद्वारे सर्व जाती-धर्मातील नागरीांंशी थेट गाव पातळीवर भेट घेवून संवाद साधण्यात सुरूवात केली आहे. ग्रामस्थांच्या समस्या व अडीअडचणी समजुन घेत त्यांना कायद्याविषयीदेखील मार्गदर्शन केले जात असल्याने या मोहिमेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

ग्रामीण भागात मोहिमेचे स्वागत
यावल तालुक्यातील वड्री, परसाडे, डोंगरकठोरा, डांभूर्णी, दहिगाव, किनगावसह शाळा, विद्यालयातील विद्यार्थीनींशी व विद्यार्थ्यांशी मॉर्निंग वॉकद्वारे संपर्क साधुन त्यांना कायदेविषयक विविध विषयावर मार्गदर्शन करीत आहेत. निरीक्षक अरुण धनवडे हे संपर्क मोहिमेंतर्गत त्यांनी किनगाव येथे 15 किलोमीटर पायदळी जात ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांनी सर्वप्रथम गावातील प्रसिद्ध मरीमाता मंदिरात जावुन देवीचे दर्शन घेवुन आपल्या संपर्क मोहिमेस सुरूवात केली. यावेळी माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, यावल पंचायत समितीचे माजी उपसभापती व पंचायत समिती सदस्य उमाकांत रामराव पाटील, मयुर पाटील, सरपंच टीकाराम मुरलीधर चौधरी यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !