भुसावळात ट्रक-दुचाकीचा अपघात : तरुण जागीच ठार


नाहाटा चौफुलीजवळील घटना : अपघातग्रस्त वाहने पोलिसांकडून जप्त

भुसावळ : भरधाव ट्रक व दुचाकीत समोरा-समोर धडक होवून झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील नाहाटा चौफुलीजवळील सोना एजन्सीसमोर घडली. या अपघातात हर्षल संतोष सपकाळे (30, श्रीनगर, अष्टविनायक कॉलनी, भुसावळ) या तरुणाचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र केतन चौधरी (27, भुसावळ) हा जखमी झाला. अपघातानंतर ट्रक चालक वाहन सोडून पसार झाला. अपघाताचे वृत्त कळताच बाजारपेठ पोलिसांनी धाव घेत ट्रक व दुचाकी जप्त केली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !