पीकअप व्हॅन-टँकरची धडक : जळगावातील दोघे ठार


एरंडोल : एरंडोलपासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावरील पातरखेडे ते तुराटखेडे दरम्यान टायर फुटल्याने अनियंत्रित झालेली पीकअप व्हॅन टँकरवर आदळून झालेल्या अपघातात जळगावच्या दोघांचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी हा अपघात झाला

जळगावातील दोघे ठार
कॉस्टिक सोड्याची वाहतूक करणारे टँकर (क्रमांक एम.एच.4 8 जे.0522) धुळ्याकडून जळगावकडे येत असताना पीकअप व्हॅन (एम.एच.15 एफ.व्ही.2381) ही धुळ्याकडे जात असताना पीपकअपचे पुढील टायर अचानक फुटल्याने ती समोरून येणार्‍या टँकरवर आदळली. या अपघातात पीकअपमधील अल्ताफ शेख वहाब मन्यार (32, रा.हाजी अहमद नगर, जळगाव) व शेख इक्बाल शेख ताहेर मण्यार (27, रा.हाजी अहमद नगर, जळगाव) हे ठार झाले तर अन्य एक जखमी झाला. मृतदेह पारोळा येथील कुटीर रुग्णालयात रवाना करण्यात आले आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !