कायदा दुधारी तलवार, सांभाळूनच कायद्याचा व्हावा वापर


अ‍ॅड.सुनील पगारे : भुसावळातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालय भूगोल सप्ताह

भुसावळ : कोणत्याही लेखी स्वरूपाची माहिती हवी असल्यास माहिती अधिकार कायद्यान्वे ती मागता येते. कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय संस्थांची माहिती मागण्याचा अधिकार प्रत्येक भारतीय नागरीकाला असून ती माहिती भारताच्या संरक्षणाविषयीची आहे ती मात्र आपण माहिती अधिकारात मागू शकत नाही मात्र जनहितासाठीची कोणतीही माहिती आपण मागू शकतो व
कायदा हा दुधारी तलवार असल्याने त्याचा वापर सांभाळून करायला हवा, स्वार्थासाठी कायद्याचा वापर करू नये, असे विचार अ‍ॅड.सुनील पगारे यांनी येथे व्यक्त केले. भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील भूगोल शास्त्र मंडळ आयोजित भूगोल सप्ताह अंतर्गत बुधवारी ‘माहितीचा अधिकार’ या विषयावर अ‍ॅड.पगारे यांचे व्याख्यान संपन्न झाले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी प्रमुख उपस्थिती महाविद्यालायचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.डी.गोस्वामी, महाविद्यालय कार्यालयीन अधीक्षक भगवान तायडे, भूगोल विभाग प्रमुख प्रा.व्ही.पी.लढे, भूगोल सप्ताह समन्वयक प्रा.अनिल हिवाळे, प्रा.प्रशांत पाटील, प्रा.अजय तायडे, प्रा.मीनाक्षी बेदरकर, प्रा.जितेंद्र पाटील, पोस्टर स्पर्धेचे परीक्षक प्रा.डॉ.विद्या पाटील यांची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांना मिळाले व्यासपीठावर
भगवान तायडे म्हणाले की, विद्यार्थ्यांना येणार्‍या अडचणी दूर होण्यासाठी माहितीचा अधिकार कायदा फार उपयोगी ठरतो. भूगोल सप्ताहात या विषयावर व्याख्याने ठेऊन विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.डी.गोस्वामी यांनी सांगितले की, माहितीचा अधिकार हा कायदा संपूर्ण देशासाठी अण्णा हजारे यांनी देऊन फार मोठे देशसेवेचे काम केले आहे.  भ्रष्टाचार दिवसेंदिवस वाढत होता. त्या परीस्थितीत हा कायदा लागू झाला. ह्या कायद्या मुळे भ्रष्टाचार थोड्या फार प्रमाणात का होईना कमी झाला आहे.

पोस्टर प्रदर्शनाला प्रतिसाद
महाविद्यालयातील कायद्यात तर फायद्यात या विषयांच्या अनुषंगाने सुमारे 78 विद्यार्थ्यांनी भूगोल आणि कायदा हा विषय घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने पोस्टर स्पर्धेत भाग घेतला. या पोस्टर स्पर्धेचे उद्घाटन अ‍ॅड.सुनील पगारे यांच्या हस्ते झाले. यामध्ये माहितीचा अधिकार, पर्यावरण संरक्षण कायदा, नागरिक कर्तव्य, मोटार वाहन कायदा, मानसिक आरोग्य कायदा अशा असंख्य कायद्यांच्या विषयांचा समावेश त्यात करण्यात आला. सूत्रसंचालन ईश्वरी लढे तर आभार प्रदर्शन रागिणी कोळी व प्रमुख पाहुण्यांचा परीचय अश्विनी कोळी तसेच प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख प्रा.व्ही.पी.लढे यांनी केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !