पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी : हतनूर धरणाचे 24 दरवाजे उघडले


Strong presence in catchment area : 24 gates of Hatnoor Dam opened भुसावळ : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे गुरुवारी सायंकाळी धरणाचे 24 दरवाजे दिड मीटरने उघडण्यात आल्याने तापी नदीला पूर आला असून प्रति सेकंद 75 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे पाच वाजता दहा तर सायंकाळी सहा वाजता सहा व सायंकाळी सात वाजता आठ दरवाजे दिड मीटरने उघडण्यात आले आहेत.

तापी नदीला आला पूर
पहाटे पाच वाजता धरणाचे दहा दरवाजे एक मीटर उंचीने उघडण्यात आल्याने तापी नदी पात्रात 19 हजार 776 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. तापी नदीत पाणी सोडण्यात आल्याने तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. मध्यप्रदेश आणि विदर्भात मोठ्या प्रमाणावर बुधवारी पाऊस झाल्यानंतर हतनूर धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली. धरणातील पाणी पातळी वाढू लागतात हतनूर धरण प्रशासनाकडून गुरूवारी पहाटे पाच वाजता धरणाचे 10 दरवाजे एक मीटर अंतराने उघडण्यात आल्याने धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे.

पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची हजेरी
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात दमदार पावसाने हजेरी लावल्याचे सूत्रांनी सांगितले. हतनूरला 64 मिलीमीटर तर टेक्सा येथे 113, बर्‍हाणपूर 28.2, देडतलाई 41.8, एरडी 70.4, गोपाळखेडा 34.4, लखपुरी 3.8, लोहारा 47.6, अकोला 85.2 असा पाऊस झाला. यात तापी नदीच्या क्षेत्रात 183 मिलीमीटर तर पूर्णा नदीच्या क्षेत्रात 241.4 मिलीमीटर पाऊस झाल्याचे व एकूण 424 मिलीमीटर पाऊस झाल्याचे धरणावरील सूत्रांनी सांगितले. हतनूर धरणातून तापी नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने तापी नदीच्या काठावरील गावांना सतर्कच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !