आगामी काळ वकीलांसाठी ठरणार ‘सुवर्णकाळ’
महाराष्ट्र-गोवा बार कौन्सीलचे अध्यक्ष अॅड.अविनाश भिडे यांचा विश्वास
भुसावळ : आगामी काळ हा वकीलांसाठी सुवर्णकाळ ठरणार असून वकीलांनी आता मॉडर्न प्रॅक्टीसचा अवलंब करावा त्यामुळे त्यांना निश्चित फायदा होणार असून तत्काळ न्याय मिळण्यासही मदत होणार आहे. भविष्यात ज्युडिशिअर्सकडे जाण्याचा कल जास्त होईल त्यासाठी बार कौन्सीलतर्फे कोचिंग क्लासेस घेण्याची सुविधा आम्ही उपलब्ध करून दिली असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र-गोवा बार कॉन्सीलचे अध्यक्ष अॅड.अविनाश भिडे यांनी बुधवारी येथे व्यक्त केले. नाशिक येथे 15 व 16 फेब्रुवारी रोजी होणार्या राज्यस्तरीय वकील परीषदेचा प्रचार व प्रचारासाठी अॅड.भिडे हे बुधवारी भुसावळात आले होते. याप्रसंगी भुसावळ वकील संघाचे अॅड.तुषार पाटील, सचिव अॅड.रभु पटषल यांनी अॅड.भिडे यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी भुसावळ बारचे अध्यक्ष अॅड.तुषार पाटील, उपाध्यक्ष अॅड.धनराज मगर, सचिव अॅड.रम्मु पटेल, सहसचिव अॅड.पुरूषोत्तम पाटील, महिला प्रतिनिधी अॅड.जास्वंदी भंडारी, ग्रंथपाल संजय तेलगोटे, अॅड.विजय तायडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी अॅड.अशोक शिरसाठ, अॅड.नरेंद्र महाजन, अॅड.नितीन रजाने, अॅड.वैशाली चौधरी, अॅड.शाम गोंदेकर, अॅड.महेशदत्त तिवारी आदींनी मनोगत व्यक्त केले.
वकीलांच्या समस्या होणार दूर
महाराष्ट्र गोवा बार कौन्सील जिल्हा फेडरेशन समिती स्थापन करणार असून त्यात संघाचे अध्यक्ष, बार कौन्सीलचे मेंबर हे सदस्य राहणार असल्याने समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

