24 जानेवारीचा महाराष्ट्र बंद यशस्वी करण्याचा निर्धार
वंचित बहुजन आघाडीसह विविध संघटनांची भुसावळात बैठक
भुसावळ : एनआरसी नागरीकत्व दुरुस्ती कायदा व सीएए या कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या शुक्रवार, 24 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. हा बंद भुसावळातही यशस्वी करण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीसह विविध संघटनांच्या बैठकीत बुधवारी करण्यात आला. शासकीय विश्रामगृहावर ही बैठक झाली.
विविध संघटनांचा बंदला पाठिंबा
महाराष्ट्र बंदला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, ए.आय.एम.आय.एम, राष्ट्रीय दलित पँथर, भुसावळ शहर संविधान बचाव समिती, भीम आर्मी संघटना, राष्ट्रीय हॉकर्स सेना, भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासह विविध संघटना पक्ष संस्था यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.



व्यापारी असोसिएशनला पत्र देणार
या बैठकीत शुक्रवार, 24 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासह आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेण्याचे निश्चित झाले. बंद यशस्वी करण्यासाठी भुसावळ शहरातील व्यापारी असोसिएशन, सराफ असोसिएशन यासह विविध हॉकर्स संघटनांना प्रतिष्ठाने बंद ठेवण्यासंदर्भात विनंती करणारे पत्र दिले असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
यांची बैठकीला उपस्थिती
बैठकीला वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, नगरसेवक उल्हास पगारे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र निकम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी, भारत मुक्ती मोर्चाचे हमीद शेख, राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन धांडे , संविधान बचाव समितीचे अध्यक्ष सलीम सेठ चुडीवाले, साबीर शेख, एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष फिरोज शेख, माजी नगरसेवक ललित मराठे, माजी नगरसेवक भीमराज कोळी, युवराज पाटील, भीम आर्मी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे, वंचितचे तालुकाध्यक्ष रुपेश साळुंखे, विद्यासागर खरात, प्रल्हाद घारू, मुन्ना सोनवणे, वंचितचे शहराध्यक्ष गणेश जाधव, निलेश जाधव वंचित महिला आघाडी महासचिव वंदना सोनवणे, उपाध्यक्ष संगीता भामरे, गणेश इंगळे, सुनील ठाकुर, निलेश जाधव, शुभम सोयंके, सुदाम सोनवणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
