भुसावळात नादुरुस्त ईपॉस मशीन बदलण्यासाठी तहसील प्रशासनाला साकडे


भुसावळ : शहरातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक मधील नादुरुस्त ई पॉस मशीन बदलण्यासाठी महिलांनी बुधवारी तहसीलदारांना साकडे घातले. तातडीने मशीनची दुरुस्ती करावी अथवा मशीन बदलून तातडीने धान्य पुरवठा करावा, अशी मागणीही करण्यात आली. गरूड प्लॉट, टिळक नगर वॉर्ड, म्युनिसीपल पार्क, धम्म नगर येथील नागरीक बुधवारी तहसीलवर धडकले. स्वस्त धान्य दुकान नंबर 14 मधील ई पॉस मशीनवर स्वस्त धान्य कार्ड धारकांचे अनेकदा ठसे उमटत नाही तर अनेकवेळा या मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने मशीन दुरुस्त अथवा नव्याने द्यावे व ते शक्य नसल्याने कॅश मेमोद्वारे धान्याचे त्वरीत वितरण करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनावर लक्ष्मी खरे, हिराबाई पाटील, ज्योती कांबळे, योगीता चौधरी, जमीला शेख रहीम, अलका महाजन, पुष्पा चौधरी आदींसह 35 महिलांची नावे आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !