अर्धापूर पालिका मुख्याधिकारी मारहाणीचा भुसावळात निषेध


कर्मचार्‍यांची निदर्शने व काळ्या फिती लावून कामकाज

भुसावळ : अर्धापूर नगरपरीषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांना नगरसेवकांनी जीवे ठार मारण्याची धमकी देत केलेल्या मारहाणीसह गडहिंग्लाज नगरपालिकेतील पाणीपुरवठा अभियंता ए.जी.गदमवाळ यांना नगरसेविका पतीने मारहाण करीत धमकी दिल्याच्या घटनेचा तसेच तळोदा नगरपालिकेतील बांधकाम लिपिक नारायण चौधरी यांना उपनगराध्यक्ष यांच्या पतीने मारझोड करीत शासकीय कामकाज अडथळा आणल्याच्या घटनेचा भुसावळ नगरपालिकेतील कर्मचार्‍यांनी गुरुवारी निषेध करीत पालिकेबाहेर निदर्शने केली. तीनही घटनांच्या विरोधात पालिका कर्मचार्‍यांनी दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज केले. याप्रसंगी राजू खरारे, दिनेश अहिरे, लेखापाल संजय बाणाईते, शेख परवेज, तृप्ती भामरे, कातोरे व कर्मचारी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !