भुसावळात 25 रोजी एकपात्री प्रयोगाचे आयोजन


भुसावळ :  उत्कर्ष कलाविष्कार व नाहाटा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, 25 रोजी सायंकाळी सहा वाजता पु.ओ.नाहाटा महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागात राष्ट्रीय एकात्मतेवर आधारीत ‘विमर्श मुंबई प्रस्तुत’ ‘अशफाकराम’ या एकपात्री नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.  महान क्रांतीकारक शहीद रामप्रसाद ‘बिस्मिल’ आणि शहीद अशफाक उल्लाह खान यांच्या जीवन व कार्यावर आधारीत एकपात्री प्रयोगाचा भुसावळकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. लेखक सुधीर विद्यार्थी तर संपादन, दिग्दर्शन व एकपात्री अभिनय मनीष मुनी करणार आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !