रावेरात चोरीचा प्रयत्न : दोघा पसार आरोपींना 22 दिवसांनी अटक


रावेर : शहरातील आयएस कॉलोनीमध्ये 31 डिसेंबर रोजी चोरी करताना एका संशयीतास पकडण्यात यश आले होते तर दोघे पसार झाले होते. या आरोपींना गोपनीय माहितीवरून अटक करण्यात आली आहे. जीआयएस कॉलनीमध्ये 31 डिसेंबर 2019 रोजी मयूर प्रकाश महाजन यांच्या घराबाहेर सेवलसिंग सिंधू मांगीलाल बारेला (30, रा.वाघरीया अंबाखेडा, ता.भगवानपुरा, जि. खरगोन, मध्यप्रदेश) हा संशयीतरीत्या उभा असल्याने त्यास पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याचे अन्य दोन साथीदार रामा (राम) रमेश बारेला (25, रा. कोठा बुजुंग, ता.झिरण्या, जि.खरगोन, मध्यप्रदेश) व दलसिंग (चिम्या) मांगीलाल बारेला (22, रा.आंबेखेडा जमाफल्या, ता.भगवानपुरा, जि.खरगोन, मध्यप्रदेश) हे चोरीसाठी घरात शिरल्याची कबुली दिली होती तर पोलिसांनी महाजन यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता तेथून दोघे संशयीत चोरी न करताच पळाले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर 22 दिवसानंतर पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक ललिकुमार नाईक, एएसआय ईस्माईल शेख, हवालदार दशरथ राणे, हवालदार जमील शेख, गुलाब सैंदाने, भरत सोपे, सुरेश मेढे, उमेश नरवाडे, महेंद्र पाटील आदींनी दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तपास एएसआय ईस्माईल शेख करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !