शिरसोलीत दोन गटात हाणामारी ; परस्पर विरोधात गुन्हे


Clash between two groups in Shirsoli; Crimes against each other जळगाव : जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात दोन गटात जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

जुन्या भांडणात मारहाण करीत हल्ला
हेमंत मुरलीधर बारी (18) हा तरूण जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात वास्तव्याला आहे. शुक्रवार, 28 जुलै रोजी रात्री 10 वाजता हेमंत बारी हा त्याचा मित्र मयूर महाजन यांच्यासोबत गावातील बसस्थानकाजवळील पानटपरी येथे गप्पा मारत बसला असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून गावातील वैभव बारी, विवेक बारी, मयूर किशोर बारी, सौरव सोनवणे (सर्व रा.शिरसोली) यांनी मारहाण करून तीक्ष्ण वस्तूने वार करून जखमी केले. ही घटना घडल्यानंतर जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. शनिवार, 29 जुलै रोजी दुपारी तीन वाजता हेमंत बारी याने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जितेंद्र राठोड करीत आहे.







चौघांविरोधात गुन्हा दाखल
दुसर्‍या फिर्यादीत म्हटले आहे की, वैभव मोहन बारी (22) हा आपल्या लहान भाऊ विवेक आणि परीवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून उदरनिर्वाह करतो. 28 जुलै रोजी रात्री 10 वाजता विवेक बारी याला काही जणांना मारहाण केली होती. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मोठा भाऊ वैभव बारी आणि विवेक बारी याला गावातील कुणाल बारी, हेमंत बारी, भोला बारी आणि मयूर महाजन यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत धारदार वस्तूने वार करून जखमी केले. यात वैभव बारी यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. याप्रकरणी वैभव बारी याने दिलेल्या फिर्यादीवरून चौघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवार, 29 जुलै रोजी पहाटे तीन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार जितेंद्र राठोड करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !