मतदान वाढीला हातभार लावल्यास मतदान टक्का वाढणार
कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील : फैजपूरात राष्ट्रीय मतदान दिवसानिमित्त कार्यक्रम
फैजपूर : आपली भारतीय लोकशाही अतिशय उज्वल परंपरा आहे आणि आपण मतदार आहे हे गर्वाची बाब असून मतदान वाढीसाठी हातभार लावून मदत केल्यास मतदान वाढीस मदत होईल, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांनी केले. ते फैजपूर येथे आयोजित दहाव्या राष्ट्रीय मतदान दिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन फैजपूर येथील जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे होते.
महाविद्यालयात नवमतदार नोंदणी गरजेची
डॉ.अविनाश ढाकणे म्हणाले की, महाविद्यलयांमध्ये नवतदारांची मतदार नोंदणी होणे गरजेचे आहे. त्यात मुलींचीही मतदार नोंदणी तितकीच आवश्यक आहे तसेच मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. मतदार वाढीसाठी बीएलओ म्हणून शिक्षक अत्यंत चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडत आहे तसेच शिक्षकांवर विश्वास असल्याने शिक्षकांना बीएलओ ची कामे सोपविली जात असेही डॉ ढाकणे यांनी सांगितले निवडणूका पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून जळगांव जिल्ह्यात मतदान प्रक्रिया अत्यंत यशस्वीपणे पार पडली. यावेळी नवमतदार विद्यार्थ्यांना मतदार कार्ड वितरण करण्यात आले तसेच उत्कृष्ट बीएलओ म्हणून कार्य करणार्या बीएलओंचा , मतदार नोंदणी मध्ये सहभाग घेणार्या शैक्षणिक संस्थांचा तसेच महाविद्यालय स्थरावर कॉलेज अंबीसीडर, नोडल ऑफिसर, सामाजिक संस्था, रावेर यावल मंडळ अधिकारी मंडळाचे तसेच मतदार वाढीसाठी विविध महाविद्यलयांमध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत सहभागी विद्यार्थी आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रसंगी पत्रकार वासुदेव सरोदे, दिलीप वैद्य, शेखर पाटील या तीन पत्रकारांचा प्राथमिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय मतदार दिवस महत्वाचा
प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले म्हणाले की, तरूणाईच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे राष्ट्रीय मतदार दिवस. या दिवसाला फैजपूर उपविभागासाठी कार्यक्रमाला परवानगी दिल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे व इतर सन्माननीय अधिकार्यांचे आभार मानत असल्याचे त्यांनी सांगत यासोबत सर्वांच्या सहकार्याने लोकशाहीला अधिक बळकटी आणण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून मतदानाविषयी सकारात्मकता निर्माण करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर जळगाव मनपा आयुक्त उदय टेकाडे, कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बोटे, तडवी, डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, अजित मुठे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.तुकाराम हुलवडे, परदेशी, धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. आभार रावेर तहसीलदार उ%

