जळगाव रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणी : सव्वा लाखांचा दंड वसुल
फुकट्या प्रवाशांमध्ये कारवाईने खळबळ : कारवाईत सातत्य राखण्याची अपेक्षा
भुसावळ : विना तिकीट प्रवास करणार्यांसह रेल्वे नियमांचे पालन न करणार्यांविरोधात उघडण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत जळगाव रेल्वे स्थानकावर शनिवारी अचानक तिकीअ तपासणी मोहिम राबवण्यात आली. विना तिकीट प्रवास करणार्या 51 प्रवाशांकडून 29 हजार 595 रुपयांचा दंड तसेच जनरल तिकीटावरून स्लीपर डब्यात प्रवास करणार्या 208 प्रवाशांकडून 96 हजार 695 रुपयांचा दंड तसेच सामानाचे बुकींग विनाच वाहतूक करणार्या एका प्रवाशाकडून 360 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. शनिवारच्या कारवाईत 260 प्रवाशांकडून एक लाख 26 हजार 390 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
यांचा मोहिमेत सहभाग
ही मोहिम भुसावळ मंडळाचे वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा, सहाय्यक वाणिज्य प्रबधंक अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. या मोहिमेत 25 तिकीट तपासणीस तसेच आरपीपीएफचे पाच कर्मचारी तसेच मुख्य टिकट निरीक्षक वाय.डी.पाठक तसेच विविध तपासणी पथकातील कर्मचारी सहभागी झाले. कटू कारवाई टाळण्यासाठी रेल्वे प्रवाशांनी तिकीट काढून प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.



