जळगाव गुन्हे शाखेची मोठी कामगिरी : अट्टल घरफोडे जाळ्यात


Big achievement of Jalgaon Crime Branch : Attal in burglary net जळगाव : जळगाव गुन्हे शाखेने अट्टल घरफोड्यांच्या मुसक्या बांधल्या असून आरोपींनी जळगाव शहरात वेगवेगळ्या भागात घरफोडी करण्यासह इतर शहरात गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे. बंटीकुमार पंचानंद सिंग (31, रा. घांगसिरसी, जि.पटणा, बिहार, ह.मु.अमरोली, सुरत) व विजय देवचंद चंद्रवंशी (बागरी, 30, रा.लुसुडीया खेमा, जि.उज्जैन, ह.मु.सुरत) अशी अटकेतील संशयितांची नावे असून संशयितांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातील नागदा येथून अटक केली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
नवीपेठ भागातील विनीत आहुजा (रा. सिध्दी कॉलनी) यांचे मोबाईल दुकान तसेच नवीपेठ भागात झालेल्या चोर्‍यांसंदर्भात गोपनीय माहिती मिळाल्यावरुन पोलीस पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासून माहिती काढण्यासह तांत्रिक विश्लेषणावरुन गुन्ह्यात आंतर राज्यातील घरफोडी करणारे बंटीकुमार पंचानंद सिंग व विजय देवचंद चंद्रवंशी (बागरी) निष्पन्न केले. संशयितांना गोपनीय माहितीनुसार मध्यप्रदेशातील नागदा येथून घरफोडीच्या साहित्यासह बुधवार, 8 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांनी जळगाव शहरातील गुन्ह्यांसह इतर राज्यात घरफोडी केल्याचे कबूल केले. दोघांकडून वेगवेगळ्या राज्यातील बनावट आधार कार्ड व चोरी केलेले महागडे तीन मोबाईल फोन व नऊ हजार 700 रुपये रोख जप्त करण्यात आले. दोघांना ताब्यात घेवून पुढील कारवाईसाठी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.







यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार रवी नरवाडे, हवालदार संजय हिवरकर, संदीप पाटील, संदीप साळवे, पोलीस नाईक प्रवीण मांडोळे, ईश्वर पाटील, महेश सोमवंशी, प्रमोद ठाकूर, मोतीलाल चौधरी यांच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !