जळगावच्या पारीजात कॉलनीत धाडसी घरफोडी : सव्वादोन लाखांचा ऐवज लांबवला


Daring house burglary in Jalgaon’s Parijat Colony : 1.52 lakh compensation extended जळगाव : शहरात चोर्‍या-घरफोड्यांचे सत्र कायम असून बंद घराला टार्गेट करीत चोरट्यांनी दोन लाख 29 हजारांचा ऐवज लांबवला. ही घटना शहरातील महाबळ परीसरातील पारीजात कॉलनीत घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
शहरातील महाबळ परीसरातील पारीजात कॉलनीमध्ये महेश विनायक वाणी हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. सोमवार, 7 ऑगस्ट रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे ड्युटीवर निघून गेले तर त्यानंतर त्यांच्या पत्नी घराला कुलूप लावून काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. घराला कुलूप असल्याची संधी साधत चोरट्यांनी दुपारी 11.30 ते 3 वाजेच्या दरम्यान, घराचा कडीकोयंडा व कुलूप तोडून घरातप्रवेश केला. त्यानंतर कपाटात ठेवलेले सोने चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण दोन लाख 29 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला







या मुद्देमालाची चोरी
चोरट्यांनी महेश वाणी यांच्या घरातून 60 हजार रुपये किंमतीची 20 ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत, 15 हजार रुपये किंमतीचे पाच ग्रॅम वजनाचे 5 सोन्याचे कर्णफुले, तीन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, दीड ग्रॅम व 3.8 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, 15 ग्रॅमची गळ्यातील चैन, 5 ग्रॅमची अंगठी, चांदीची कुयरी, चांदीची वाटी, चांदीच्या साखळ्या, चांदीचा गोप, जोडवे, डायमंड लावलेली 5 ग्रॅमची अंगठी, स्मार्ट वॉच, दोन मनगटी घड्याळ यासह रोख 10 हजार रुपये असा एकूण दोन लाख 29 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला.

चोरीच्या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी संदीप गावीत, रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !