जुन्या वादातून जळगावात एकावर गोळीबार : संशयित पोलिसांच्या ताब्यात
Shooting at one in Jalgaon due to old dispute : Suspect in police custody जळगाव : भरदिवसा जुन्या वादातून एकावर झालेल्या गोळीबारानंतर शहरात मोठी खळबळ उडाली. ही घटना जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फातीमा नगरात जुन्या वादातून घडल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी स्वप्नील उर्फ सोपान चंदूसिंग मोरे (राजपूत, 25, गजानन पार्क, रा.कुसुंबा, ता.जळगाव) यास ताब्यात घेण्यात आले.
जुन्या वादातून हवेत केला गोळीबार
एमआयडीसी परीसरातील व्ही.सेक्टरमधील प्रभा पॉलीमर कंपनीसमोर गुरूवार, 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जुन्या वादातून स्वप्निल उर्अ सोपान मोरे याने गावठी गट्टा घेवून आकाश तवर यांच्याशी शाब्दिक वाद केला. या रागातून स्वप्निलने कमरेला लावलेला गावठी कट्टा काढून आकाशवर दोन वेळा गोळीबार केला. सुदैवाने यात आकाशला कोणतीही दुखापत झालेली नाही. ही घटना घडल्यानंतर परीसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, एमआयडीसी पोलीसांना गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून संशयित आरोपी सोपान परदेशी याला ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस हस्तगत केले आहे.






तीन दिवसांपुर्वीच खरेदी केला गावठी कट्टा
सोपानने तीन दिवसांपुर्वीच 16 हजार रूपयात गावठी कट्टा आणि तीन काडतूस खरेदी केल्याची माहिती आहे. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक निरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सचिन पाटील, इम्रान सैय्यद यांच्यासह आदींनी घटनास्थळी धाव घेतली.


