चाळीसगावात गांजावर कारवाई : दोघे यंत्रणेच्या जाळ्यात
Action on ganja in Chalisgaon: Two in the net of the system चाळीसगाव : शहरातील गोपालपुरा भागात गांजा विक्री करणार्यांवर शहर पोलिसांनी छापा टाकून 88 हजार 570 रुपये किंमतीचा तीन किलो 314 ग्रॅम गांजा हस्तगत केला.. या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून इतर दोघे पसार झाले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
चाळीसगाव शहरातील गोपालपुरा भागात बेकायदेशीर गांजा विक्री होत असल्याची गोपनिय माहिती पोलीस उपअधिक्षक अभयसिंह सुर्यवंशी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याची पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक
संदीप पाटील यांच्या नेतृत्वात पोलिसांनी बुधवार, 9 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता गोपालपुरा भागात छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 88 हजार 570 रूपये किंमतीचा 3 किलो 314 ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात.






याप्रकरणी मांगीलाल मुरलीधर गुजर (54, गोपालपुरा, चाळीसगाव) आणि नसीमबी अश्रमअली (55, नागदरोड, झोपडपट्टी, चाळीसगाव) यांना ताब्यात घेण्यात आले तर पिंटू पवार आणि साजन लंगड्या (दोन्ही रा.चाळीसगाव) हे पसार झाले आहेत. पोलीस नाईक दीपक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहे.


