रसलपूरच्या बेरोजगार युवकाची आत्महत्या


रावेर : तालुक्यातील रसपूलर येथील 20 वर्षीय अविवाहित युवकाने बेरोजगारीला कंटाळून काहीतरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रसलपुर शेत-शिवारात शनिवारी मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने रसलपूर गावात खळबळ उडाली आहे. राजू भूरा बारेला (20, रसलपूर, ता रावेर) असे मयत युवकाचे नाव आहे. राजू हा शेतीची कामे करून उदरनिर्वाह करीत होते मात्र शनिवारी रात्री दिड वाजेच्या सुमारास काही तरी विषारी पदार्थ प्राशन करून त्याने आत्महत्या केली. राजू बारेलाच्या हाताला गेल्या काही दिवसांपासू काम मिळत नसल्याने त्याला नैराश्याने ग्रासल्याचे सांगण्यात आले. रावेर ग्रामीण रुग्णायात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !