शेतमजुरांची मुजोरी : मारहाण करीत शेतकर्‍याकडील मोबाईलसह रोकडच लुटली


Farm laborers were beaten up and robbed of cash and mobile phone from the farmer धरणगाव : शेतमालकाला मारहाण करून 15 ते 17 मजुरांनी मोबाईल आणि रोकड लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना गुरुवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

असे आहे मारहाण प्रकरण
बिपीनचंद्र जगन्नाथ तिवारी यांनी तालुक्यातील अनोरे येथील मुकादम तुकाराम रामा गायकवाड यांच्याकडील सुमारे 15 मजूर शेतातील डाळिंब काढण्यासाठी कामाला लावले होते. मजूर कामासाठी आले होते परंतू ते काम न करता शेतामधून निघून गेले. गुरुवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास शामखेडा शिवारातील शेतात ते हजर असताना शेतात कृष्णा बारेला, रामलाल करोले, राजु बारेला हे मजूर शेतात डाळिंब तोडत होते. मजुरांपैकी संदीप रतीलाल सोनवणे (रा. आनोरा ता. धरणगाव), शादु नाईक (रा.कंडारी, ता.अमळनेर), गोपाल (पूर्ण नाव माहीत नाही), नरेश (पूर्ण नाव माहीत नाही), सागर (पूर्ण नाव माहीत नाही) (सर्वे रा. आनोरा ता. धरणगाव) व त्याच्यासोबत 15 से 17 लोकांनी हातात विळा, लोखडी कुर्‍हाड, काठ्यांनी काहीएक न बोलता मारहाण केली तसेच ओप्पो कंपनीचा दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईलने या लोकांची शुटिंग करीत असताना मारहाण करणार्‍यापैकी एकाने मोबाईल हातातून हिसकावून घेतला तसेच एकाने पॅन्टच्या उजव्या खिश्यात हात टाकून खिश्यातील पाच हजार रुपये रोख जबरीने काढुन घेतले. यानंतर मारहाण करीत असतांना एकाने डोक्यावर कुर्‍हाड मारून दुखापत केली.







बिपीनचंद्र तिवारी यांना मारहाण सुरू असताना शेतातील काम करणारे इतर मजूर वाचविण्यासाठी धावत आल्याचे पाहून संदीप रतीलाल सोनवणे, शाह नाईक, गोपाल (पूर्ण नाव माहीत नाही), नरेश (पूर्ण नाव माहीत नाही), सागर (पूर्ण नाव माहीत नाही) सर्व व त्यांच्या सोबतचे 15 ते 17 जणांनी तुझ्यावर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे तिवारी यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्या डोक्याला तीन टाके पडले असल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले. दरम्यान, भादंवि कलम 395, 324 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !