शेतमजुरांना अश्लील शिविगाळ करीत विनयभंग : शेतमालकाविरोधात गुन्हा
Harassment by abusing farm laborers: A crime against the farm owner धरणगाव : शामखेडा शिवारातील शेतात कामासाठी आलेल्या मजुरांना अश्लील व जातीवाचक शिविगाळ करून महिला मजुरांचा विनयभंग केल्याप्रकरणी शेतमालक बिपीन जगन्नाथ तिवारी (धरणगाव) यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे नेमके प्रकरण
धरणगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या 25 वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, धरणगाव येथील बिपीन जगन्नाथ तिवारी यांच्या शेतात डाळींब तोडण्याचे कामासाठी एका मुकादमच्या माध्यमातून मिळाल्यानंतर र 10-12 महिला-पुरुष मजूर बुधवार, 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9.15 वाजेच्या सुमारास शेतात आले. काम करीत असताना एक महिला मजूर ही भरलेला डाळिंबचा क्रेट ट्रॅक्टरमध्ये खाली करण्यासाठी गेली असता ट्रॅक्टरजवळ उभे असलेले शेत मालक बिपीन तिवारी यांनी अश्लील शिविगाळ केली.






संबंधित महिलेने घडलेली घटना सहकार्यांना सांगितल्यावर त्यांनी तिवारी काका तुम्ही असे का बोलले? असा जाब विचारला असता त्यांनी पुन्हा घाण-घाण शिव्या द्यायला सुरुवात केली तसेच तुम्हाला ईथेच खल्लास करून टाकतो, तुम्हाला धरणगावही पास करू देत नाही, अशी धमकी दिली. यानंतर एका शेतमजूर पुरुषालाही तुम्ही शेरभर अनाज भिकारी आहेत, तुमची काम करण्याची दाणत नाही, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. दरम्यान, या प्रकरणी शेतमालक बिपीन तिवारी यांच्याविरुद्ध पीडीत महिलेच्या फिर्यादीवरून अॅट्रासिटी, विनयभंग यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर करीत आहेत.


