सात वर्षीय बालिकेचा खून : नराधम पित्याला जन्मठेप


Murder of seven-year-old girl : Murderer’s father gets life imprisonment जळगाव : कौटुंबिक वादासह दारुच्या व्यसनातून नराधाम बापाने सात वर्षाच्या पोटच्या गोळ्याचा खून केला होता. बांभोरी पुलाखालील नदीपात्रात ही घटना घडली होती. याप्रकरणी आरोपी संदीप यादव चौधरी (मूळ रा.करणखेडा, ता.अमळनेर, ह.मु. हिरागौरी पार्क, निमखेडी) यास गुरुवारी जिल्हा सत्र न्यायाधीश एम. क्यु. एस. एम. शेख यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

आधी मुलगी हरवल्याची दाखल होती तक्रार
जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील हिरागौरी पार्क येथे संदीप चौधरी हा पत्नी नयना आणि मयत मुलगी कोमल चौधरी (7) यांच्यासह वास्तव्याला होता. संदीप चौधरी याला दारू पिण्याचे व्यसन असल्याने तो नेहमी दारुच्या नशेत राहत होता. जानेवारी 2020 रोजी सकाळी दारू पिण्याच्या कारणावरून पत्नी नयना चौधरी यांना मारहाण केली होती. यावेळी त्यांची मुलगी पप्पा मम्मीला मारु नका, असे बोलली होती. त्याचा राग मनात संदीप चौधरी याच्या मनात होता. त्याच दिवशी दुपारी चार वाजता नयना चौधरी यांनी मुलगी कोमल हिला शिकवणीला सोडले. त्यानंतर संदीप चौधरी हा शिकवणीतून चिमुकलीला परस्पर सोबत घेवून गेला. रात्रभर तो मुलीला घेवून घरी परत न आल्यामुळे दुसर्‍या दिवशी सकाळी तालुका पोलिसात मुलगी व पती हरविल्याची तक्रार दिली होती.







आत्महत्या केल्याचा दिला निरोप
संदीप चौधरी याने मालकाला त्याने मॅसेज करुन मी मुलीला बांभोरी पुलाखाली मारुन टाकले असून मी आत्महत्या करीत असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार लागलीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तेथून कोमलचा मृतदेह ताब्यात घेतला होता. याप्रकरणी संदीप चौधरीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे, वासुदेव मराठे यांनी करीत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

हा खटला जिल्हा न्यायलयाचे सत्र न्यायाधीश एम.क्यू. एस. एम शेख यांच्या न्यायालयात चालला. सरकार पक्षाकडून 12 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मुलीची आई, आरोपीचे मालक, शिकवणी घेणारी शिक्षीका यांच्यासह इतरांची साक्षीदारांसह सादर केलेल्या पुराव्या आधारे न्यायमुर्ती शेख यांनी आरोपी संदीप चौधरी याला दोषी ठावून आजन्म कारावास आणि 5 हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. सुरेंद्र काबरा यांनी कामकाज बघितले.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !