गणेश कॉलनीत ईमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरून पडताच मजुराचा मृत्यू


A laborer died after falling from the second floor of a building in Ganesh Colony जळगाव : सेंट्रींग काम करणार्‍या मजुराचा बांधकामाच्या ठिकाणी दुसर्‍या मजल्यावरून पडताच मृत्यू झाला. ही घटना जळगाव शहरातील गणेश कॉलनी परीरात बांधकामाच्या ठिकाणी शुकवारी दुपारी दोन वाजता घडली. रहिम कासम पिंजारी (52, ममुराबाद) असे मयताचे नाव आहे.

तोल जावून पडताच मृत्यू
रहिम पिंजारी हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे वास्तव्याला होते. ठेकेदाराकडे बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रींगचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. शुक्रवार, 11 ऑगस्ट रोजी गणेश कॉलॉनी परिसरात एका ठिकाणी बांधकामाच्या ठिकाणी ते सेंट्रींग काम कीत असताना दुपारी 2 वाजून 10 मिनीटांनी काम करत असतांना त्यांचा तोल गेल्याने ते दुसर्‍या मजल्यावरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सोबत काम करणार्‍या मजूरांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी रुखसाना आणि जुबेर व तौसीफ हे दोन मुले असा परीवार आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !