जळगाव एलसीबी अॅक्शन मोडवर : तीन गुन्ह्यातील त्रिकूट जाळ्यात
Jalgaon LCB on action mode: Trio of three crimes in net जळगाव : जळगाव गुन्हे शाखेने तीन गुन्ह्यातील त्रिकूटाला बेड्या ठोकल्या आहेत. धरणगाव शहरातून 2 तर जळगाव शहरातून एका आरोपीला अटक करण्यात आली असून शनिवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. तिघांकडून चोरीच्या दोन दुचाकी आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव जिल्ह्यातील जळगाव तालुका पोलीस स्टेशन, धरणगाव पोलीस स्टेशन आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी आणि दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी हे धरणगाव शहरातील आणि जळगावातील असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पथकाने शनिवारी सायंकाळी 6 वाजून 15 मिनीटांनी धरणगाव शहरातून संशयित आरोपी राजू भिमसिंग बारेला (23) आणि दीपक सुमर्या बारेला (29, दोन्ही रा.मधुकर नगर, धरणगाव) यांना अटक केली. दोघांकडून चोरीच्या दोन दुचाकी आणि एक मोबाईल हस्तगत केला तर दुसर्या पथकाने संशयित आरोपी रमेश फुलसिंग देवरे (23, श्रीकृष्ण लॉनी, जळगाव) याला जळगावातून अटक केली. त्यांच्याकडून एक चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला. पुढील कारवाईसाठी धरणगावातील दोघांना जळगाव तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले तर जळगावातील चोरट्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.






यांनी केली कारवाई
एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निलेश राजपूत, गणेश वाघमारे, जितेंद्र पाटील, सुधाकर आंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, संदीप साळवे, नितीन बाविस्कर, नंदलाल पाटील, भगवान पाटील, ईश्वर पाटील, हेमंत पाटील, भारत पाटील आणि अशोक पाटील यांनी ही कारवाई केली.


