भुसावळातील प.क.कोटेचा महाविद्यालयात बोगस शिक्षक भरती : संस्थाध्यक्ष, प्राचार्यांसह सहा जणांविरोधात गुन्हा

बोगस शिक्षकांनी शासनाचा दहा लाखांचा पगारही लाटला ः तक्रार अर्जावरून गुन्हा


Bogus recruitment of teachers in P. K. Kote’s college in Bhusawla: Case against six persons including the president, principal  भुसावळ : शहरातील श्री सरस्वती प्रसारक मंडळ संचलित प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात खोट्या ठरावांसह दाखल्यांद्वारे दोन शिक्षण सेवकांची बेकायदा भरती करून शासनाला तब्बल दहा लाखांचा चुना लावण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तक्रार अर्जावरून संस्थाध्यक्षा, प्राचार्य, दोन शिक्षण सेवकांसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पोलीस आता आरोपींना अटक करणार का? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

बोगस ठरावांद्वारे शिक्षण सेवक भरती
श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळ संचलित प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात महेश चौधरी व रुकसाना बी.ताज्जुमल यांना 2014 ते 2017 या काळात संस्थेत शिक्षण सेवक म्हणून कागदोपत्री रूजू करून घेण्यात आले तसेच त्याबाबत खोटा ठराव व खोटे दाखले तयार करण्यात आले तसेच खोटी माहिती माहिती शिक्षण उपसंचालक, नाशिक कार्यालयात सादर करण्यात आली. दोघा शिक्षण सेवकांच्या पदासह वेतनश्रेणीला मान्यता मिळाल्यानंतर जानेवारी 2022 ते जुलै 2022 या सात महिन्यात शासनाकडील तब्बल 10 लाख 54 हजार 630 रुपयांचा पगारही लाटून शासनाची फसवणूक करून शासन रकमेचा अपहार करण्यात आला.







यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळाच्या माजी संस्थाध्यक्ष फिर्यादी जयश्री शालिग्राम न्याती (70, शारदा नगर, भुसावळ) यांनी भुसावळ शहर पोलिसात याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर या अर्जाबाबत चौकशी झाल्यानंतर शनिवारी रात्री संशयित आरोपी तथा शिक्षण सेवक महेश अरविंद चौधरी, शिक्षण सेवक रुकसाना बी.ताज्जुमल तसेच प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य मंगला आल्हाद साबद्रा, सचिव संजय सुरेशचंद्र सुराणा, श्री सरस्वती प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा पद्माबाई मोतीलाल कोटेचा, प्रा.डॉ.जर्नादन विश्वनाथ धनवीज यांच्याविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघण करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !