अल्पवयीन मुलीचा विनयभंग


पहूर : माझ्याशी का बोलत नाही असे म्हणत सतरा वर्षीश अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. पहूर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री 10 वाजता एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे विनयभंग प्रकरण
जामनेर तालुक्यातील एका गावात 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. रविवार, 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 वाजता अल्पवयीन मुलगी ही एकटी असतांना घरी असताना गावातील आकाश संपत साबळे हा घरी आला. त्याने तिचा पाठलाग करून घरात प्रवेश केला, तू माझ्याशी का बोलत नाही, मी तुझा फोटो व्हाट्सअ‍ॅप डीपीवर ठेवेल, तुला काय करायचे आहे ते कर असे म्हणून तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या अवस्थेत पीडीतेनपे ही घटना घरात सांगितली. त्यानुसार पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर सोमवारी रात्री 10 वाजता संशयित आरोपी आकाश संपत साबळे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्ज करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !