जळगावात आर.एल.फर्ममध्ये ईडीकडून छापेमारी
ED raids in RL firm in Jalgaon जळगाव : राज्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक राजमल लखीचंद ज्वेलर्समध्ये सक्त वसुली संचालनालयाचे पथक दाखल झाले असून अधिकार्यांकडून गुरुवारी सकाळी अचानक छापा टाकून चौकशीला सुरूवात झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या पथकासोबत आयकर विभागही असल्याचे कळते मात्र त्यास अधिकृतरीत्या दुजोरा मिळू शकलेला नाही. पथक नेमकी कसली चौकशी करीत आहे वा पथकाला अद्यापपर्यंत काय हाती लागले? याचा तपशील कळू शकला नाही.
एकाचवेळी छापेमारीने खळबळ
जळगाव शहरातील प्रसिद्ध सराफ पेढी राजमल लखीचंद ज्वेलर्समध्ये गुरुवारी पहाटे गाड्यांचा ताफा पोहचला. फर्ममध्ये सक्तवसुली संचालनालय आणि आयकर विभागाची धाड पडल्याचे सुरुवातीला सांगण्यात येत होते. मात्र फर्म संबंधित एका व्यक्तीशी चर्चा केली असता सक्तवसुली संचलनालय आणि आयकर विभागाकडून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. माजी आमदार मनीष जैन हे अधिकार्यांशी बोलत असल्याचे त्यांनी सांगितले.








