एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी : दुचाकी चोरट्यांची चौकडी जाळ्यात
Major achievement of MIDC police : Four wheeler thieves in the net जळगाव : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी दुचाकी चोरी करणार्या चौकडीला बेड्या ठोकल्या आहेत. चोरट्यांकडून चोरीच्या दोन दुचाकी व शाळेतून चोरी गेलेले साहित्य हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील भरत गंगाराम बारी (43, शिरसोली) यांची दुचाकी (क्रमांक एम.एच.19 सी.एल. 3032) ही घरासमोरून चोरट्यांनी 21 मे रोजी रात्री 11 वाजता चोरीला गेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना ही दुचाकी चार जणांनी चोरून नेल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने बुधवार, 16 ऑगस्ट रोजी रात्री कारवाई करत संशयित आरोपी अजय विजय भिल, किरण गोपाळ भिल, मयुर किशोर बारी आणि सौरव राजू सोनवणे (सर्व रा. शिरसोली, ता.जि.जळगाव) यांना अटक केली. त्यांनी चोरीच्या दोन दुचाकी आणि शिरसोली शाळेतील चोरून नेलेले साहित्य काढून दिले. याप्रकरणी चौघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








