पारोळा तालुक्यातील तरुणीची विषारी द्रव घेत आत्महत्या


Parola taluka girl commits suicide by consuming poisonous liquid जळगाव : पारोळा तालुक्यातील शेवगे येथील तरुणीने विषारी द्रव घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गेल्या आठ दिवसांपासून मृत्यूशी ती झुंज देत होती मात्र ही झुंज अपयशी ठरली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शीतल अनिल पाटील (शेवगे, ता.पारोळा, जि.जळगाव) असे मृत तरुणीचे नाव आहे.

आत्महत्येचेे कारण अस्पष्ट
शीतल ही आपल्या कुटुंबासोबत राहत होती. तिने 10 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 वाजता पिकांवर फवारणी करण्याचे विषारी औषध प्राशन केले त्यामुळे अस्वस्थ वाटू लागल्याने तिच्या नातलगांनी तिला उपचारासाठी पारोळा येथील कुटीर रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला धुळे येथील खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असतांना 14 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता तिची प्राणज्योत मालविली. या घटनेची नोंद पारोळा पोलिसात करण्यात आली. तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !