दुचाकी अपघात : अडावदचा प्रौढाचा मृत्यू तर मुलगा गंभीर


Two-wheeler accident: Adavad’s adult dies and boy seriously जळगाव : ममुराबाद-विदगाव रस्त्यावरील फार्मसी कॉलेजसमोर दुचाकी घसरल्याने अडावदच्या दुचाकीस्वाचा मृत्यू झाला तर मागे बसलेला मुलगा गंभीर जखमी झाल्याची झाला. हा अपघात बुधवार, 16 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजून 25 मिनीटांनी घडला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. . विनोद हरी कोळी (इंदिरा नगर, अडावद, ता.चोपडा) असे मयताचे नाव आहे.

दुचाकी घसरून अपघात
विनोद हरी कोळी हे आपल्या परीवारासह चोपडा तालुक्यातील अडावद येथे वास्तव्याला होते. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. बुधवार, 16 ऑगस्ट रोजी कामाच्या निमित्ताने विनोद कोळी हे त्याचा मुलगा सागर विनोद कोळी याच्यासोबत दुचाकी (एम.एच.19 बी.व्ही.9121) ने जळगावात आले होते. काम आटोपून घरी जाण्यासाठी ममुराबादमार्गे निघाले. रात्री 9 वाजून 25 मिनिटांनी ममुराबाद ते विदगाव रस्त्यावर असलेल्या फार्मसी कॉलेजसमोर अचानक दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी घसरली. यात विनोद कोळी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा सागर कोळी हा गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !