संतप्त जमावाने ट्रक जाळला : 19 तरुणांना अखेर अटक
An angry mob burnt a truck : 19 youths were finally arrested जळगाव : गोमांस वाहून नेत असल्याच्या संशयातून जमावाने ट्रक जाळला होता. याप्रकरणी 19 जणांविरुद्ध धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली. नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच शांतता बाळगावी, असे जळगाव पोलिस दलातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
असे आहे प्रकरण
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2023 रोजी औरंगाबाद येथुन शर्मा ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालवाहू ट्रक (यु.पी.93 टी. 8135) हा (चामडे) भरुन कानपूर उत्तर प्रदेश येथील लेदर फॅक्ट्रीत जात होता. त्या ट्रकवर सल्लु खान बाबु खान हा चालक आणि मानसिंग श्रीराम कुशवाह हा क्लिनर असे दोघे जण हजर होते. दरम्यान बांभोरी नजीक काही समाजकंटकांनी या मालवाहतूक करणा-या ट्रकचा पाठलाग केला. पाळधी, ता.धरणगाव येथे या ट्रकला अटकाव करण्यात आला. पोलिसांनी सामंजस्याने हस्तक्षेप करत जमावाला कायदा हाती न घेण्याचे आवाहन केले होते.






18 संशयितांना अटक
पशुवैद्यकिय अधिकार्यांना घटनास्थळी बोलावून ट्रकमधील जनावरांच्या कातड्यांचे नमुने तपासणीकामी पाठवण्यात आले. बेकायदेशीर जमलेल्या जमावातील काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक करून पोलीस वाहनांची तोडफोड केली. याशिवाय ट्रकवरील चालक सल्लु खान बाबु खान व क्लिनर मानसिंग श्रीराम कुशवाह यांना जिवे ठार करण्याचा प्रयत्न करत ट्रक पेटवून दिला होता. ट्रक चालक व क्लिनर या दोघांचा जीव वाचवून अग्नीशमन दलाच्या मदतीने पेटलेला ट्रक विझवण्यात आला. या घटनेला अनुसरुन धरणगाव पोलीस स्टेशनला गु.र.नं.289/23 भादवि कलम 307, 353, 332, 435, 143, 147, 427 सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 3 सह मपोका कलम 37 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकू 18 आरोपीतांना अटक करण्यात आली.
कायदा हातात न घेण्याचे आवाहन
पाळधी, ता.धरणगाव जवळ जाळण्यात आलेल्या ट्रकमध्ये जनावरांचे कातडे (चामडे) असून गोमांस नसल्याची पोलिसांची खात्री झाली असून या कातड्यांचे नमुने तपासणीकामी पाठवण्यात आले आहे. जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कायदा कुणी हातात घेवू नये तसेच शांतता भंग करु नये, असे आवाहन जळगाव पोलीस दलाने केले आहे.


