जामनेर तालुक्यातील महिलेवर अत्याचार
Abuse of woman in Jamner taluka जामनेर : जामनेर तालुक्यातील एका गावातील 35 वर्षीय महिलेला धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ईरफान ईस्माईल सैय्यद या संशयिताविरोधात जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे अत्याचार प्रकरण
35 वर्षीय पीडीता जामनेर तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहेत. संशयित ईस्माईल इरफान सय्यद (25) याने 2 ते 27 जुलै 2023 दरम्यान, सलगी वाढवून जबरदस्तीने 35 वर्षीय पिडीत महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरीक संबंध प्रस्तापित केले तसेच ही बाब कोणला सांगितली तर जिवे मारण्याची धमकी दिली. कुटुंबीयांना जिवे ठार मारण्याची धमकी दिल्यामुळे पीडीतेने घाबरून शनिवार, 19 ऑगस्ट रोजी उशीराने फिर्याद दिली. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे हे करीत आहेत. पोलिसांनी तत्काळ संशयित आरोपीला अटक केली.








