चाळीसगावातील व्यावसायीकाच्या नावाने पेटीएम कंपनीला पावणेदोन कोटींचा गंडा


Paytm company received two crores in the name of a businessman in Chalisgaon चाळीसगाव : चाळीसगावातील व्यावसायिकासह पेटीएम कंपनीची 1 कोटी 87 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन शेटे (रा. सॉफ्ट इन्फोसेस प्रा. लि. 4, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडीया एमआयडीसी चिखलठाणा औरंगाबाद) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

अस आहे फसवणूक प्रकरण
चाळीसगाव येथील फ्रीलान्स सर्व्हिस प्रोव्हायडर भरतकुमार उत्तम राठोड यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, सचिन शेटे याने भरतकुमार राठोड यांना पेटीएम कंपनीचे उत्तर महाराष्ट्र विभागासाठी रीसेलर म्हणून व्यवसाय करण्याचे आमिष दाखवले. भरतकुमार राठोड यांचे चाळीसगाव येथे मास्टर माईंड सर्व्हिसेस नावाने आस्थापना आहे.







विश्वासाने दिलेल्या आस्थापनेच्या कागदपत्रांसह मेल आयडी आणि लॉगिन डिटेल्सचा सचिन शेटे याने गैरवापर केला. लॉगिन डीटेल्स तांत्रिक बाबींची दुरुस्ती करण्याचा बहाणा करत फिर्यादी भरतकुमार राठोड यांच्याकडून घेतलेल्या मेल आयडी शी मिळताजुळता मेल आयडी तयार केला. या मेल आयडीच्या माध्यमातून पेटीएम कंपनीचे 1 कोटी 87 लाख 6 हजार 477 रुपये किंमतीचे क्रेडीट्स फिर्यादी राठोड यांनी वापरल्याचे भासवण्यात आले. त्यात राठोड यांचे नाव वापरुन कंपनीसोबत कम्युनिकेशन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर ढिकले हे करत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !