ट्रॅव्हसमधील प्रवाशाचा एक लाखांचा लॅपटॉप लांबवला : कजगावातील भामटा चाळीसगाव शहर पोलिसांच्या जाळ्यात
One lakh laptop stolen from passenger in Traverse : Bhamta of Kajgaon in Chalisgaon city police net चाळीसगाव : ट्रॅव्हल्समधून प्रवास करणार्या प्रवाशाचा महागडा एक लाखांचा लॅपटॉप चोरणार्या भामट्याला चाळीसगाव शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून योगेश शामलाल पाटील (27, जुनेगाव, कजगाव, ता.भडगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
ट्रॅव्हल्समधून उतरताना लांबवली बॅग
तक्रारदार हर्ष प्रवीण पाटील (20, कन्नड, जि.छत्रपती संभाजी नगर) हे पुणे येथून सरस्वती ट्रॅव्हलने दोन दिवसांपूर्वी कन्नड येथे जात असतांना प्रवासादरम्यान ट्रॅव्हल सिग्नल चौक, चाळीसगाव येथे पहाटे सहा वाजता उतरत असताना त्यांची बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी चाळीसगाव शहर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली.






अखेर संशयिताला बेड्या
चाळीसागव शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे दीपक पाटील, अमोल भोसले यांना चाळीसगाव शहरातील गणेश कॉम्प्लेक्स परीसरात एक संशयित हा बिल नसलेला महागडा लॅपटॉप विक्रीसाठी घेवून आल्याचे कळताच पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, हवालदार योगेश बेलदार, हवालदार नितीन वाल्हे, दीपक पाटील, तुकाराम चव्हाण, अमोल भोसले, गणेश कुंवर, निलेश पाटील, शरद पाटील, प्रवीण जाधव, नंदकिशोर महाजन, विनोद खैरनार, मोहन सूर्यवंशी यांच्या पथकाने
योगेश शामलाल पाटील (27, जुनेगाव, कजगाव, ता.भडगाव) यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून चोरी केलला लॅपटॉप जप्त केला. तपास पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक पाटील व अमोल भोसले करीत आहेत.


